Vidarbh24News

Latest Online Breaking News

गुरांच्या लम्पी त्वचा आजारावर चंद्रपूर जिल्ह्यात २ लक्ष ३० हजार लसीकरणाचे नियोजन : ना. विजय वडेट्टीवार

गुरांच्या लम्पी त्वचा आजारावर चंद्रपूर जिल्ह्यात २ लक्ष ३० हजार लसीकरणाचे नियोजन : ना. विजय वडेट्टीवार

६४ हजार लसीचे लसीकरण सुरू ;बाधीत जनावरे वेगळी ठेवा

प्रत्येक तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

विदर्भ24न्यूज,प्रतिनिधी

चंद्रपूर दि १६ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरांना लम्पी या त्वचेच्या आजाराला प्रतिबंध करणाऱ्या 64 हजार लसीचे जिल्ह्यात वितरत करण्यात आले आहे. सोमवारपासून बाधित जनावरे असणाऱ्या भागात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत व चिमूर येथे दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर लम्पि आजाराची लागण हिट असून जनावराच्या शरीरावर अगोदर गाठी येणे व नंतर ताप येत असून यामुळे पाळीव जनावरांचे मृत्यू सुद्धा होत असल्याची माहिती मा पालकमंत्री वडेट्टीवार याना मिळताच त्यांनी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन यावं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले तसेच 1 लाख लास पुणेवरून मागविण्यात येत असल्याचे सांगून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिबाराचे आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच चिमूर येथे उपविभागीय कार्यालयात कोरोना संदर्भात विभागाची आढावा बैठक घेत असताना शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने या आजाराबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली. तथापि, या लसीचे वितरण शुक्रवारपासूनच सुरू झाले आहे. सोमवारपासून बाधित अधिक असणाऱ्या भागात लसीकरण राबवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
काल 15 ऑगस्ट रोजी आपल्या भाषणामध्ये या संदर्भात उल्लेख केला होता. जिल्हाधिकार्‍यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. याशिवाय दोन दिवसांपूर्वीच पुणे येथील संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून उर्वरित लसीची उपलब्धता करून देण्याबाबत निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांना यासंदर्भात अवगत करण्यात आले आहे. शुक्रवारीच 64 हजार लसी जिल्ह्यात पोहचल्या असून जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमार्फत लसीचे वितरण देखील सुरू झाले आहे. सोमवारपासून यासंदर्भात जिल्हाभरात अभियान राबविण्यात येणार आहे. तथापि, शेतकऱ्यांनी ज्या जनावरांना बाधा झाली आहे. अशांना वेगळे ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
बाधित झालेल्या जनावरांवर उपचार आणि जे बाधित झाले नाही, त्यांना तातडीचे लसीकरण मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्याच्या सर्वदूर भागांमध्ये सध्या जनावरांवर हा आजार आला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी या दोनही अधिकाऱ्यांना उपाययोजना सक्त व सुलभतेने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एकूण दोन लाख 30 हजार लसींचा प्रस्‍ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी ६४ हजार लसी पोहचल्या आहेत. उर्वरित लसी संदर्भात आपला पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी चिमूर उपविभागीय अधिकारी संपकाळ यांना यावेळी त्यांनी निर्देश दिले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!