वाघाच्या हल्यात गुराखी जखमी सायखेडा येथील घटना
वाघाच्या हल्यात गुराखी जखमी सायखेडा येथील घटना
विदर्भ24न्युज, प्रतिनिधी
ब्रेकिंग न्यूज……
सावली: तालुक्यातील सायखेडा येथील नीलकंठ रघु वाघरे हे गुराखी आज गायी,बैल चारण्यासाठी गुराखी जंगल परिसरात नेलं असतांना अचानक वाघाने गुराखर्यावर हल्ला केला. त्यात गुराखी जखमी झाला.
ही घटना पाथरी उपवनक्षेत्रातील कन्पारमेन्ट क्रमांक 150 खानाबाद मध्ये घडली.गुराखी जखमी झाल्याची माहिती मिळताच वनविभाग ला माहिती देण्यात आली.व पाथरी PAC मध्ये दाखल केले त्या नंतर गडचिरोलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
वाघाचा सद्वया धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी त्रस्त असून वनविभागाने वाघाचे बंदोबस्त करावे अशी ग्रामस्थांनी मागणी करत आहेत.



