Vidarbh24News

Latest Online Breaking News

कायर लगतच्या नवरगाव शेतशिवारात विजेच्या धक्क्याने शेतमजुराच्या जागीच मृत्यू

कायर लगतच्या नवरगाव शेतशिवारात विजेच्या धक्क्याने शेतमजुराच्या जागीच मृत्यू

वणी :- वणी तालुक्यातील कायरलगत असलेल्या नवरगाव भोयर यांचा शेतात कामाकरता गेलेला शेतमजूर विलास गणपत मोहूर्ले वय 42 .वर्षे रा. खेडी ता.सावली जि. चंद्रपूर हा शेतमजूर मागील चार ते पाच वर्षापासून प्रभाकर नारायण राव भोयर रा.वणी यांच्या नवरगाव येथील शेतात शेतमजूर (सालगड़ी) म्हणून काम करत  होता .नेहमीप्रमाणे तो आज दिनांक 13. 8 .2020 रोज गुरुवार सकाळी 10.00 सुमारास शेत पाहणी करण्याकरिता गेला होता .अचानक तिथे त्याला शेतात ठेवलेला कुत्रा हा मक्याचा पिकाजवळ तडफडत असताना आढळले पण त्या कुंपणावर एम.ए .सि.बी चे चालू विजेते मेन वायर तिथे पडलेल्या अवस्थेत होते .तो कुत्रा तडफडत असल्याने चित्र पाहून हा शेतमजूर मृतक विलास गणपत मोरे यांनी त्या जिवंत एम.ए .सि.बी पडलेल्या मेन तारेला उचलण्यास सुरुवात केली असता तिथेच त्या शेतमजूराचा व शेतातील कुत्र्याच्या सुद्धा जागीच मृत्यू झाला .ही बातमी नवरगाव व कायर ह्या गावात वार्‍यासारखी पसरली असता.त्या गावात  सर्वतोपरी हळहळ व्यक्त होत आहे.त्या मृतकाचा परिवारात फक्त दोन मुले आता त्यांना आई सुद्धा नाही, अशा अवस्थेत त्यांच्या कुटुंबात जणूकाही दुःखाचा डोंगर कोसळले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!