सिंदेवाही येथे १८,४६,२००/- दारुसाठा जप्त
संपुर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणे आहे.
सिंदेवाही येथे १८,४६,२००/- दारुसाठा जप्त
सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके आज दिनांक २८-०७-२०२० रोजी सांन्हा क्रमांक ५/२०२० वेळ ०५.१० अन्वये सोबत पोलीस स्टाफ पो.हवालदार देवानंद सोनूले ब न ३९०,पोशि राहूल ब न ६७८ चालक सहाय्यक फौजदार ब न १०१० यांचे सोबतसिंदेवाही मध्ये पेट्रोलिंग करून सिंदेवाही कडून राजोली मार्गे पेटगाव कडे जात असताना एक कथ्यां रंगाचा संशयित रित्या ट्रक जात असताना दिसला.

सदर ट्रक च्या चालकास हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला असता त्याने फौजी धाब्याजवळ ट्रक थांबवून ट्रक चालक पळून गेला मात्र त्याचा पाठलाग केला असता तो ट्रक चालक मिळून आलेला नाही.सदर ट्रक हा टाटा कंपनीचा क्र. एम एच३१ सी बी ३६७७ हा आहे.ट्रकमध्ये मिळालेल्या मालापैकी ४,७५,२०० रुपये किंमतीचे एकूण३३पेट्या प्रत्येकी ४८ नग प्रमाणे एकूण १५८४ नग मॅकँडोवल नं.१ कंपनीच्या विदेशी दारूच्या काचेच्या शिश्या प्रत्येकी १८० एम एल दारूने भरलेल्या बॅच नं १७० दि.१७/०७/२०२० व ५,७०,०००/-किमंतीच्या २९ पेट्यामध्ये प्रत्येकी१००नग प्रमाणे २९०० नग व ७ चुंगळ्या मध्ये २८०० नग असे एकूण ५७०० नग देशी दारू सुपर सॉनिक रॉकेट संत्रा कंपनीच्या ह्या देशी दारू प्रत्येकी९० एम एल च्या भरलेल्या आणि २०० नग टिनाचे खाली पिपे प्रत्येकी किंमत ५ रु. प्रमाणे १०००रुपये व ८,००,००० रु.किंमतीचा टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण १८, ४६, २०० रु चा माल जप्त केला आहे. तरी नमूद आरोपी यांचे कृत्य कलम ६५ अ मदाका प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.



