Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणीत आणखी एक कोविड सेंटर सुरु होणार

      वणीत आणखी एक कोविड सेंटर सुरु होणार

 वणी :- वणीत वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वणीतील कोरोना पेशंट ची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने एक नवीन कोविड सेंटर सुरू करण्याचे ठरवले आहे. पाहता पाहता आज पर्यंतच्या रुग्णांचा आकडा जवळपास वीस पर्यंत पोहोचला आहे .वारंवार आपल्याला एक नवीन तक्रार माहीतच आहे की, परसोडा येथील सेंटरवर सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. या समस्यांचे निराकरण करण्याकरिता वणी विधानसभेचे आमदार व नगराध्यक्ष बोर्ड यांनी 26 जुलै रोजी एसडीओ कार्यालयात तातडीची बैठक घेतली.या बैठकीत उपविभागीय अधिकारी शरद जावड़े मुख्याधिकारी संदीप बोरकर व ईसीएस प्रमुख उपस्थित होते. याची चर्चा अशी की ,परसोडा येथील सुविधा उत्तम व्हाव्या व रोग्याच्या बाबतीत काळजी घेण्यात यावी व तसेच कंटेनमेंट झोन कडे लक्ष देण्यात यावे ,जेणेकरून वणी शहरात कोरोना चे रोगी वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे.कारण यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा याठिकाणी कडकडीत बंद जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे .ती परिस्थिती वणीत येऊ नये अशा सूचना आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी दिले आहेत व तसेच वणीचे नगराध्यक्ष म्हणाले की, वणीकराच्या मागणीनुसार सेंटर मध्ये कोरोना चाचणी सुरू झाली आहेत तसेच दुसरे कोरोना सेंटर सुरू होणार आहे. गावाबाहेरील शाळेची पाहणी करून सेंटरची निवड करण्यात येणार आहे असे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी म्हटले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!