११ लाख ४०००हजार रुपयांचा दारू सकट मुद्देमाल जप्त
११ लाख ४०००हजार रुपयांचा दारू सकट मुद्देमाल जप्त
पोलीस स्टेशन सिंदेवाही हद्दीतील नवरगाव -उमरवाई मार्गे मुलकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध दारूची तस्करी होत असल्याची खात्री लायक खबर मिळाली खबरे वरून उमरवाई येथे पाठलाग करून फोर्ड कंपनीची कार ज्यामध्ये २० पेट्या आणि स्विफ्ट कंपनीची कार यामध्ये १० पेटा देशी दारू संत्रा रॉकेट असे एकूण ३० खोके मध्ये ९० ml प्रति पेटी १०० प्रमाणे एकूण ५,००,०००/- लाख रुपयाचा दारूसाठा जप्त करण्यात आला. सोबतच दोन मोबाईल किंमत ४०००/- हजार रुपये स्विफ्ट कार किंमत ३,००,०००/-लाख रुपये स्विफ्ट कार किंमत असा एकूण ११ लाख ४०००/-हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुन्यात. चार आरोपीला अटक करण्यात आली असून ते मुल येथील आहेत. सदर कारवाई मध्ये कलम ६५ ई ८३ मुदाका प्रमाणे आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाई ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल देवा सोनुले, राहुल राहते, कपिल भोयर, कामदी यांनी केली.



