राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते पराग दातारकर यांचा वृक्षारोपण व बालगोपाला सोबत मिळून वाढदिवस साजरा करण्यात आला.
आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजूरा शहर प्रतिनिधी 8855994001
राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते पराग दातारकर यांचा वृक्षारोपण व बालगोपाला सोबत मिळून वाढदिवस साजरा करण्यात आला.
माजी आमदार अँड संजय धोटे यांची प्रामुख्याने उपस्थिती*
दि. १२ जुलै २०२० ला राजुरा येथील सामाजिक कार्यकर्ते पराग दातारकर यांनी आपला वाढदिवस गोशाळा चुनाळा येथे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला, कार्यक्रमा प्रसंगी गोशाळेत गो मातेचे पूजन करून तसेच गोमातेला गूळ चारून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,यावेळी गोशाळेच्या परिसरात माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,गोशाळेतील बालगोपाला सोबत केक कापून तसेच बालगोपाला खाऊचे वाटप करण्यात आले
होते.
पराग दातारकर हे राजुरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे,राजुरा शहरात कोणत्याही कार्यक्रमात त्याचा पुढाकार नेहमी असते,त्यांच्या मागे युवकांची मोठया प्रमाणात फळी उभी असते,कोणतेही सामाजिक किंवा धार्मिक काम असो त्याचा मोलाचा योगदान ते देत असते अश्या कार्यकर्त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांनीही बोलताना म्हणाले की पराग दातारकर यांना मी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देतो,त्यांनी आज वाढदिवसा निमित्त जो संकल्प केला की वृक्षारोपण तसेच बालगोपाला सोबत वाढदिवस साजरा त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा, अशेच लोकहितेचे कार्य आपल्या हातून घडत राहील हीच यावेळी मी अपेक्षा करतो पुनश्च एकदा ईश्वर आपल्याला निरोगी आरोग्य,देवो हीच मनोकामना करतो,यावेळी भाजपचे नेते सतीश धोटे,गोशाळाचे अध्यक्ष दिलीप म्हैसे ( मामा),आदित्य रांजीकर,मयूर कुंडे,अमेय धोटे, संयोग धोटे,निकेश माणुसमारे, अभिलाष धोटे, अजित मत्ते,रुपेश जयपूरकर तथा गोशाळेतील बालगोपाल मोठया संख्येने उपस्थित होते.



