अमिताभ पाठोपाठ आता ऐश्वर्याही कोरोना पॉझिटिव्ह
अमिताभ पाठोपाठ आता ऐश्वर्याही कोरोना पॉझिटिव्ह
अमिताभ आणि अभिषेक बच्चनच्या पाठोपाठ आता ऐश्वर्या राय बच्चन व त्यांची मुलगी आराध्यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या दोघींच्याही कोरोना चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबियांतील ऐश्वर्या आणि आराध्या या दोघींची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जया बच्चन यांचीही कोरोना टेस्ट केली होती. जया यांच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. दरम्यान, बच्चन कुटुंबियांचं राहतं घर म्हणजेच जलसा बंगला मुंबई महापालिकेने सील केला आहे. तसंच सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे. तर ऐश्वर्या आणि आराध्यावर सध्या उपचार सुरु आहेत. काल महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला कोरोनाची लागण झाल्याचं समोरं आलं. याबाबत त्यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती दिली. अमिताभ सध्या नानावटी रूग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.



