नॅशनल इन्स्टीटयूट आॅफ टेक्नाॅलाॅजी श्रीनगर मध्ये शुभमची निवड
नॅशनल इन्स्टीटयूट आॅफ टेक्नाॅलाॅजी श्रीनगर मध्ये शुभमची निवड
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे सुयश
भारतीय तंत्रज्ञान संस्थेद्वारा दरवर्षी घेण्यांत येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील एम.एस्सी. या अभ्यासक्रमासाठी घेण्यांत येणाऱ्या पात्रता परिक्षेत स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा बि.एस्सी. अंतिम वर्षाला शिक्षण घेत असलेला विद्यार्थी शुभम रमेश लाटेलवार हा उत्तीर्ण झाला आहे. शुभम सावली तालुक्यातील मोखाळा या छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी आहे हे विशेष.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाच्या प्रथम यादीमध्यें नॅशनल इन्स्टीटयूट आॅफ टेक्नाॅलाॅजी श्रीनगर या ठिकाणी एम.एस्सी. रसायनशास्त्र या विषयाच्या प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये प्रतिभेची कमतरता नसते फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते सुध्दा राष्ट्रीय स्तरावरील परिक्षांमध्यें चांगले यश संपादन करू शकतात असे मत प्राचार्य डाॅ. ए. चंद्रमौली यांनी व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थी शुभम लाटेलवार आणि त्यांचे मार्गदर्शक प्रा. संदीप देशमुख यांचा गौरव करण्यांत आला. शुभम लाटेलवारने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार, उपाध्यक्ष नंदाताई अल्लुरवार आणि अनिल स्वामी यांचेसह संस्थेच्या पदाधिका-यांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या यशाचे श्रेय शुभम लाटेलवार यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंदाना दिले आहे



