कृषि संजीवनी सप्ताहाचे समारोप वृक्षरोपनाने !
कृषि संजीवनी सप्ताहाचे समारोप वृक्षरोपनाने !
कृषि पदवीधर संघटना व सुरभि कृषि तंत्र विद्यालय, सावली यांच्या संयुक्तरित्या कृषि संजीवनी सप्ताहाचे समारोपीय कार्यक्रम सुरभि कृषि तंत्र विद्यालय, सावलीच्या प्रक्षेत्रात वृक्षरोपण करून करण्यात आले.
वृक्षरोपणचा कार्यक्रम श्री. एस. आर. ढवळे तालुका कृषी अधिकारी व श्री. ए. व्ही. वाघमारे मंडळ कृषि अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस सुरभि कृषि तंत्र विद्यालयाच्या वतीने श्री. संजय पाराशर, ए. पि. पिसे, एस.के. कोठारे, एस.जी. मुप्पिडवार, आर.एस.अंनतलवर, टी. ए. मेश्राम, ए. ए. मानकर व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शासनाने १ जुलै ते ७ जुलै हा सप्ताह महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , हरीत क्रांती चे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस कृषी दिन म्हणून महाराष्ट्रात पाळण्यात येतो ,या सप्ताहात वृक्ष लागवड करणे, शेतकऱ्यांना बियाणे ची माहिती देणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बियाणे विकसित करणे , आपल्या शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे, त्यांच्या बांधावर जाणे , किटकनाशकांची माहिती देणे आदी कार्यक्रम विविध ठिकाणी राबवण्यात आले.



