कोहमारा येथील अपात्र होमगार्ड सैनिकाने दिली कोरोनाच्या काळात ३ महीने निस्वार्थ सेवा..
कोहमारा येथील अपात्र होमगार्ड सैनिकाने दिली कोरोनाच्या काळात ३ महीने निस्वार्थ सेवा..
विदर्भ 24 न्यूज़
गोंदिया:- जील्ह्यातील पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील अपात्र होमगार्ड सैनिक विजय सदाराम वरकडे, वय ३७ वर्षे , रा.कोहमारा, ता. सड़कअर्जुनि, जिल्हा गोंदिया, यानी सन -२०२० मध्ये माहे २० मार्च २०२० ते ३० जून २०२० पावेतो कोवीड -१९ अख्या राज्य भरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता तब्बल तीन महीने निष्काम सेवेकरिता पोलीस विभागाच्या वतीने पोलीस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत जानार्या राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.दरम्यान विजय सदाराम वरकडे,अपात्र होमगार्ड सैनिक सनद क्र.६२० हे अपात्र असून यांनी स्वयंप्रेरनेणे पोलीस स्टेशनला येऊन काम करण्याची सदिच्छा दर्शविल्याने त्यास नेमलेल्या पोलीस बंदोबस्तातील कर्मचार्या सोबत कर्तव्यास बंदोबस्त लावला असता त्यांनी दिलेले कर्तव्य ईमाने इतबारे पार पाडले, त्यांचेकडून कोणाताही अनुचित प्रकार किंवा कोणाचीही तक्रार आलेली नाही, त्यांनी त्यांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडले,असता सदर पोलिस स्टेशन चे ठानेदार मा.पवार साहेब यांनी प्रमाणपत्र देऊन कोरोना योधा म्हणुन सत्कार केला. सदर महाराष्ट्र राज्यातील १६ हजार अपात्र होमगार्ड सैनिकांनी मा. मुख्यमंत्री साहेबांकड़े अपात्र होमगार्ड सैनीकांना पात्र करुन सेवेत सेवा करन्याचि संधी देन्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे..



