Vidarbh24News

Latest Online Breaking News

वीजबिल माफ करण्याच्या मागणी साठी बल्लारपुरात झाले मुंडन आंदोलन

सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना पाठवलेले भरमसाठ वीजबिल माफ करण्याच्या मागणी साठी बल्लारपुरात झाले मुंडन आंदोलन

लॉक डाउन काळातील वीजबिल माफ़ करा अन्यथा विघूत मंडळ अधिकारी च्या विरोधात आक्रमक होवू : राजु झोडे

बल्लारपूर प्रतिनिधी-लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हातात काम नाही.जनता आर्थिक हतबल झाली.सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे .अशातच विजवीतरण कंपनीने सर्व जनतेला सरसकट वारेमाफ वीज वितरणबिल पाठवून एकप्रकारे जनतेची अग्नी परीक्षाच घेतली आहे. एकत्रितरित्या बिल पाठवल्यामुळे सर्व साधारण जे बिल येत होते . त्याच्या तिप्पट , चौप्पट बिल आले येत असल्याचा आरोप तहसीलदार बल्लारपूर मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
एकीकडे कोरोनाच्या काळात कोणतेही आर्थिक स्रोत नसतांना जनतेनी वीज वितरण कंपनीचे अवाढव्य वीज बिल भरायचे कसे?असा मोठा प्रश्न निर्माण झाला असतांना या लॉकडाउन काळात विज वितरण कंपनीने सामान्य जनता आणि शेतकऱ्यांना पाठविलेले 3 महिन्याचे वीज बिल का आणि कसे भरायचे?या प्रश्नाचे उत्तरही शासनानेच सुचवावे.अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

वीज वितरण कंपनीचे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज उलगुलांन संघटने तर्फे मुंडन आंदोलन करून शासनाचा प्रतिकात्मक निषेध नोंदविण्यात आला.विज बिल सरसकट माफ करा,अथवा मिनीमम स्लॅब रेटने बिल पाठवा;अशी मागणी करत त्वरीत विज बिल माफ करण्यात आले नाही तर अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही उलगुलांन संघटनेचे नेते राजू झोडे यांनी निवेदनातून दिला आला आहे.

तहसील कार्यालयापुढील परिसरात झालेल्या मुंडन आंदोलनात नेते राजू झोडे,सचिन पावडे,संपत कोरडे,दिगंबर कोडापे ,दिनेश दुपारे,पंचशील तामगाडगे,यांनी मुंडन करीत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंदना तामगाडगे, उषा रेड्डी ,मंगला नगराळे ,मनोज बेले ,भूषण पेटकर ,गुरु कामटे ,अनिरुप पाटिल ,मारोती कपासें ,मनोज वानखेड़े ,जॉकिर खान ,भगतसिंह झगडे आदि कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!