विद्युत बिलाच्या जनता (मुंडन) आंदोलनात आपण सर्वजण सहभागी व्हा..!!
विद्युत बिलाच्या जनता (मुंडन) आंदोलनात आपण सर्वजण सहभागी व्हा.- राजूभाऊ झोडे उलगुलान संघटना अध्यक्ष
*कोरोना च्या महाभयंकर संकटकाळात वारेमाप विद्युतबिल पाठवणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात मुंडन आंदोलन करून निषेध करण्यासाठी माझ्यासोबत आपणही दिनांक 24 जून 2020 ला सकाळी 11 वाजता आपल्या स्तरावरून या वीज बिलाविरोधात मुंडन आंदोलन करून जाहीर निषेध करावा असे सर्वांना आवाहन करतो.*
*आपण जिथे राहता ज्या गावात, वार्डात, शहरात अशा ठिकाणी आपण वीज बिल विरोधात फिजिकल डिस्टन्स ठेवून मुंडण आंदोलन करून वारेमाप विजबिल पाठवणाऱ्या सरकारच्या धोरणाविरोधात जाहीर निषेध करून पाठवलेले लाॅकडाऊन काळातील तिन महिन्याचे बिल माफ करण्यासंदर्भात एकजुटीने वज्रमूठ तयार करा व शासनाला वीजबिल माफ करण्यास भाग पाडा.*



