1285 पात्र पोलीस उपनिरीक्षक उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती करा– अन्यथा तीव्र आंदोलन,
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक – अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले निवेदन,
विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी
उस्मानाबाद / सन 2016 मध्ये पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत पात्र झालेले 1285 उमेदवार यांना अजूनपर्यंत नियुक्ती आदेश दिलेले नाहीत, त्यामुळे या उमेदवारांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही, म्हणून या सर्व 1285 पात्र उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवेदनामध्ये असेही म्हटले आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता शासनाची जर आर्थिक बाजू खराब असेल तर, हे सर्व 1285 उमेदवार आहे त्याच पदावरच्या वेतनावर किमान एक ते दीड वर्ष नोकरी करण्यास तयार आहेत,परंतु त्यांना अगोदर नियुक्ती आदेश द्यावे. तसेच या प्रत्येक उमेदवारांची नोकरी ही 14 ते 15 पूर्ण झाली असून, त्यांना पोलीस खात्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात यांच्या ट्रेनिंगचा प्रश्न उदभवत असेल तर ,त्यांना डायरेक्ट प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात यावे. या करीता दिनांक 22 जून 2020 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा उस्मानाबाद जील्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फतिने महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देण्यात आले,सन 2008 च्या पोलीस भरतीमध्ये सर्व ट्रेनिंग सेंटर मध्ये जागा शिल्लक नसल्याने तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर.पाटील साहेब यांनी 09 महिन्यांची ट्रेनिंग करण्याच्या ऐवजी 06 महिन्यांची ट्रेनिंग करा , असे आदेश दिले होते, त्यामुळे 06 महिन्यात सुद्धा ह्या सर्व लोकांनी पोलीस खात्यातील सर्व परीक्षा / नियम पूर्ण केले होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, 1285 पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश द्या, या मागणीसाठी पोलीस बॉईज असोसिएशनने संपूर्ण महाराष्ट्रातून वारंवार निवेदने दिली, मोर्चे काढले, तसेच डिसेंबर 2019 नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यावेळचे गृहमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांनाही पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे मोर्चा काढून निवेदन दिले होते.तसेच 07 जून 2020 रोजी सध्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख साहेब यांची चंद्रपूर येथे भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले होते. तरीसुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर या 1285 उमेदवारांना लवकरात लवकर प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती आदेश देण्यात यावे, अन्यथा पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य तर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या घरासमोर तीव्र निदर्शने केली जातील व याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची राहील,असा इशारा पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष – प्रमोद वाघमारे यांनी दिला आहे.



