सावलीच्या रुनयची तहसीलदारपदी निवड
सावलीच्या रुनयची तहसीलदारपदी निवड
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे दिनांक 19 जून ला निकाल घोषित करण्यात आला यामध्ये सावलीचे चिरंजीव रुनय प्रकाशराव जक्कुलवार यांची तहसीलदार पदी निवड झाली. महाराष्ट्रातून 58 क्रमांकावर असून त्याला 500 पैकी 452 गुण मिळाले आहेत. शालेय शिक्षणापासूनच त्याने प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते त्यासाठीच तो आठ-आठ तास अभ्यास करीत होता. रुनयच्या रूपाने सावली शहराचा मुलगा तहसीलदार झाला हे सर्व सावली वासियांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. रुनयचे सर्वांकडून कौतुक होत आहे.



