Vidarbh24News

Latest Online Breaking News

*“गुणवंतांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा गौरव- रोहित बोम्मावार”*

*साथ फाउंडेशनतर्फे सावलीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार सोहळा संपन्न*

सावली : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा गौरव करण्यासारखे आहे, या भावनेतून साथ फाउंडेशनच्या वतीने सावली तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा “गौरव गुणवंतांचा” विशेष सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष मा. रोहितभाऊ बोम्मावार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. रोहितभाऊ बोम्मावार होते. प्रमुख अतिथी म्हणून सावली वनपरिक्षेत्र अधिकारी मा. विनोदजी धुर्वे तसेच सावली न्यायालयाचे अधिवक्ता मा. धनंजयजी आंबटकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील अभिमान यामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी मार्गदर्शन करताना मा. रोहितभाऊ बोम्मावार यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश मिळविता येते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढून त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

प्रमुख अतिथींनी देखील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या मेहनत, जिद्द व चिकाटीचे अभिनंदन केले. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, भविष्यात अधिक मोठे यश मिळविण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष मुन्नाभाऊ स्वामी, भाजपा ज्येष्ठ नेते प्रकाश पा. गड्डमवार, देवराव सावकार मुद्दमवार, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिशजी बोम्मावार, भाजपा युवा नेते निखीलजी सूरमवार, माजी नगरसेवक भोगेश्वरजी मोहुर्ले, भाजपा नेते राकेशजी विरमलवार, मोतीलालजी दुधे, मनोहरजी गेडाम, सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरजजी बोम्मावार, इंजी. घड्से साहेब, सुनीलजी बोमनवार, इम्रानजी शेख, मयूरजी व्यास यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन ताराचंदजी खोब्रागडे यांनी प्रभावी शैलीत केले. प्रास्ताविक प्रफुलजी निरूडवार यांनी केले तर आभार प्रदर्शन साथ फाउंडेशनचे संचालक आशिषजी गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी साथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करणारा हा सोहळा सावली तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!