Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावली तालुक्यात रमाबाई विद्यालयाचा दबदबा; हर्षदा वाळके प्रथम*

सावली, (बाबा मेश्राम)

फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयाने पुन्हा एकदा तालुक्यात अव्वल यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हर्षदा भारत वाळके हिने ९२.८० टक्के गुण प्राप्त करून सावली तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांकांवर याच विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा दबदबा राहिला आहे.

विद्यालयातील कु. सिमरण कैलास गेडाम हिने ९२.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर कु. आचल गिरिधर बोरकर हिने ९२.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा तालुकाभर चर्चा होत आहे.

यावर्षी विद्यालयाचा एकूण निकाल ९४.४७ टक्के इतका लागला असून तो तालुक्यातील सर्वाधिक निकाल ठरला आहे. विद्यालयातील तब्बल ३८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ६७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. ही आकडेवारी सावली तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सर्वोत्तम मानली जात आहे.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामागे संस्थाध्यक्षा चंदा सुभाष गेडाम, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर. पी. चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्षा, सचिव, संचालक मंडळ, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!