Vidarbh24News

Latest Online Breaking News

*रमाबाईची “हर्षदा वाळके” तालुक्यातन प्रथम*…..

“रमाबाई आंबेडकर विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम”

*सावली,(बाबा मेश्राम)*
नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ग १० वी च्या फेबु/मार्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात सावली तालुक्यात रमाबाई आंबेडकर विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे बाजी मारली असून विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हर्शदा भारत वाळके हीने ९२.८०% गुण प्राप्त करून सावली तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. सावली तालुक्यात पहिल्या तीन क्रमांकावर याच विद्यालयाचे विद्यार्थी आहेत हे विशेष.
इयत्ता १० वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. निकालात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा तालुक्यातील रमाबाई आंबेडकर विद्यालयाने बाजी मारली असून विद्यालयाचा एकुण निकाल ९४.४७% इतका तालुक्यातून सर्वाधिक लागला आहे. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हर्शदा भारत वाळके ही ९२.८०% गुण प्राप्त करून सावली तालुक्यातून प्रथम आली आहे तर कु. सिमरण कैलास गेडाम ही ९२.६०% गुण प्राप्त करीत व्दितीय तर कु. आचल गिरिधर बोरकर ही ९२.२०% गुण प्राप्त करीत तालुक्यातून तृतीय आली आहे.
रमाबाई आंबेडकर विद्यालय सावलीचे एकुण ३८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत तर ६७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. ही आकडेवारी सावली तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये सर्वोत्तम आणि सर्वाधिक आहे.
विद्यार्थ्यांच्या आणि विद्यालयाच्या या यशात संस्थाध्यक्षा. चंदा सुभाष गेडाम सह सर्व संचालक मंडळ ,मुख्याद्यापक आर.पी.चौधरी तसेच सर्व मार्गदर्षक शिक्षकांचा समावेष आहे. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थाध्यक्षा, सचिव, संचालक मंडळ,प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शेक्षणिक वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!