Vidarbh24News

Latest Online Breaking News

*तिन्ही शाखेत विश्व शांती उच्च माध्यमिक विद्यालयाची बाजी*

 *कला विभागात प्रतिक्षा मराठे तर विज्ञान विभागात दिक्षा जेंगठे तालुक्यात प्रथम*

*सावली*  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ,पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील कला ,विज्ञान आणि वाणिज्य या तीनही विभागात तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे ,त्यात कला विभागात प्रतीक्षा अशोक मराठे हिने ४८७ (८१.१७)टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम तर विज्ञान विभागात दिक्षा हितेश जेंगठे हिने ४७७(७९.५०) टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम तर वाणिज्य विभागात विनायक जयप्रकाश सोनुले याने ४७६ (७९.३३) टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.

कला विभागात द्वितीय क्रमांक कु. स्वेजल विलास घोटेकर ४७७ (७९.५०), तृतीय प्रदीप ओमदेव आभारे ४७०(७९.३३) गुण मिळविले आहे.

विज्ञान विभागात द्वितीय कु.समीक्षा अतुल देऊरघरे ४६५ (७७.५०) टक्के तर तृतीय कु. धनश्री पुरुषोत्तम समर्थ ४४३ (७३.८३) हिने पटकाविला आहे. वाणिज्य विभागात द्वितीय सुमित सुरेश गडपायले ४३०(७१.६७),तृतीय तुषार दिवाकर संदोकार ४०८(६८.००)टक्के गुण मिळविले आहे,एचएचसीव्हीसी इलेक्ट्रिकल विभागात प्रथम दिशांत प्रल्हाद लोढे, हॉर्टिकल्चर विभाग प्रथम यामिना रुमाजी मंगर,क्रॉप सायन्स विभाग प्रथम बंटी नकटू ठाकूर याने पटकाविला आहे

गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार ,सचिव राजाबाळ पाटील संगीडवार,सर्व पदाधिकारी तथा सदस्य , विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक राजेश झोडे, विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!