Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावलीत काँग्रेसला मोठे खिंडार; ‘गड्डमवार’ गटाचे मुन्ना स्वामी समर्थकांसह भाजपात*

*”आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश; सहकार क्षेत्रात खळबळ”*

सावली (बाबा मेश्राम): सावली तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अनिल उर्फ मुन्ना स्वामी यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या घडामोडीमुळे सावलीच्या राजकीय व सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

 

आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात सावली येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, गडचिरोली जिल्हा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मानद सचिव आवेश खान पठाण, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर, देवराव मुद्दमवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनिल उर्फ मुन्ना स्वामी यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य मुक्तेश्वर भोपये, चकपिरंजी ग्रामपंचायतीचे सदस्य अमृत चौधरी, माजी उपसरपंच राजू बुर्रीवार तसेच खेडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच परशुराम मार्लावार यांनीही भाजपात प्रवेश केला. आमदार बंटी भांगडिया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

जिल्हा बँकेचे संचालक रोहित बोम्मावार यांच्या नेतृत्वात सावली तालुक्यात भाजपाचे संघटन अधिक मजबूत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

यावेळी आमदार भांगडिया यांनी रोहित बोम्मावार यांच्या समाजकार्य व राजकीय कार्याचे कौतुक करत नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना भाजपा सदैव त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास दिला.

या कार्यक्रमाला अर्जुन भोयर, छायाताई चकबंडलवार, भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नितीन कारडे, भाजपा शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, युवा नेते निखिल सुरमवार, राकेश विरमलवार, विनोद धोटे, सूरज किनेकर, विठ्ठल येगावार, कवींद्र रोहनकर, प्रतिभा बोबाटे, मनीषा चिमूरकर, रेवता मडावी, अनिल येनगंटीवार आदी उपस्थित होते.

— बॉक्स —

सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

सावलीतील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनिल उर्फ मुन्ना स्वामी यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे. सहकार क्षेत्रातील हा प्रभावी गट आता भाजपाच्या तंबूत गेल्याने आगामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे तालुक्यातील सहकार राजकारणाची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!