*साथ फाउंडेशन तर्फे नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार*
“सिडीसिसि बॅंक संचालक रोहित बोम्मावार यांची उपस्थिती”
*बाबा मेश्राम*
सावली*_शहरातील नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा साथ फाउंडेशनच्या वतीने साथ कार्यालयात नुकताच आयोजित करण्यात आला.चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजपा युवा नेते, रोहित बोम्मावार यांच्या उपस्थितीत ‘सावली करियर पॉईंटच्या’ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यात नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.कु. गार्गी नितेश रस्से, समीर चरणदास मांदाडे, त्रिकाय प्रमोद गेडाम या विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड होणे ही सावलीसाठी अभिमानाची बाब ठरली असून त्यांच्या या यशामागे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचा त्याग व पाठिंबा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले,

यशस्वी विद्यार्थ्यांचा, संचालक रोहित बोम्मावार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. व विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही शैक्षणिक अडचण आल्यास साथ फाउंडेशन नेहमी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,असे आश्वासन देत समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी बोम्मावार यांनी केले.
सत्कार सोहळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे आई-वडील,,सावली करियर पॉईंटचे मार्गदर्शक विवेक खरवडे, कु. रितिका मॅडम,कु.तमन्ना मॅडम, काजल सोनुले,व परिसरातील अनेक नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



