खरवड गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
वरोरा : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, बार्टी पुणे अंतर्गत समतादूत रमेश मडावी यांनी खरवड गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला गावातील तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष सुभाष मारोती वसाके यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार अर्पण केला. त्यानंतर गावातील नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने अभिवादन करत उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाला भारत खैरे, विठ्ठल सावरकर, विजय ढोले, प्रफुल चरणदास क्षीरसागर, गजानन उद्धव नरड, पुरुषोत्तम क्षीरसागर, दादा ढोले यांसह बौद्ध समाजातील अनेक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांचे महान कार्य स्मरले.
कार्यक्रमाचे आयोजन साधे, सन्मानपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडले.



