*महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कर्ज वाटप – रोहित बोम्मावार*
सावली: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सावली शाखेत बचत गट कर्ज व वाहन कर्ज वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व समाधानाच्या वातावरणात पार दि. २७ नोव्हेंबरला बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे पार पडला.

महिला आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला बचत गटांना कॅश क्रेडिट कर्जाच्या माध्यमातून 2 लाख रुपये मंजूर करण्यात आले. तर कृषीक्षेत्राच्या विकासासाठी ट्रॅक्टर वाहन कर्ज म्हणून 5 लाख 54 हजार रुपये इतकी मोठी रक्कम वितरित करण्यात आली.
यामुळे मिळून एकूण 7 लाख 54 हजार रुपयांचे कर्ज धनादेश स्वरूपात लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमात संचालक विनोद धोटे, आकाश बुरीवार, ईश्वर बट्टे, शाखाधिकारी एन. डी. घोनमोडे, शाखा निरीक्षक नरेश पाडेवार, सुरज नरेड्डीवार तसेच शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी रोहित बोम्मावारनी सांगितले की,
“महिला बचत गटांना कर्ज वितरणामुळे रोजगाराच्या आणि स्वावलंबनाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच वाहन कर्जामुळे शेतकऱ्यांची शेती मशागत अधिक सुलभ व कार्यक्षम होणार आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि सुसंवादपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कर्ज वितरणामुळे सावली परिसरातील महिला व शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.



