Vidarbh24News

Latest Online Breaking News

विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धा भंडारा येथे संपन्न

भंडारा:- दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी ओबीएन अबॅकस तर्फे विदर्भस्तरीय स्पर्धेचे भव्य आयोजन मंगळम हॉल भंडारा येथे करण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातून सुमारे २०० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला .कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्य अतिथि मा. श्री. ज्ञानचंद जांभूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवर पाहुणे म्हणून श्री. विजय केवट, श्री. प्रितम कुंभारे श्री. समीर शेख श्री. विलास केजरकर श्री. शैलेश पटले श्री. नितिन निनावे श्री. गोवर्धन कुंभारे हे प्रामुख्याने उपस्थित होते.


विद्यार्थ्यानी विविध स्तरावरील स्पर्धामध्ये आपले अबॅकस कौशल्य सादर करून उपस्थित पाहुणे तसेच पालकांची मने जिंकली . मुलांच्या जलदगती गणनाक्षमतेमुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांना आचार्यचकीत करणारा अनुभव घेता आला. “सध्याचे माहिती व तंत्रज्ञानाची युग आहे.काळासह चालणारा विद्यार्थी स्वतःला अद्ययावत करू शकतो.अबॅकससारख्या कमी वेळेत गणिते सोडवण्याच्या पद्धतीमुळे मुलांचा मानसिक विकास होण्याबरोबर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे. अबॅकसने मुले कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट सोडवतात यासोबतच १ ते ९९ पर्यंतचे पाढे मुले न पाठ करता म्हणून, तयार करून दाखवतात. मुलांची स्मरणशक्ती आत्मविश्वास, एकाग्रता, बौद्धिक क्षमता यामुळे वाढते. अबॅकस शिक्षण मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आणि गणित कौशल्ये वाढवण्यासाठी एक मौल्यवान पर्याय असल्याचे नमूद केले आहे. विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेत वेदांत क्षीरसागर , अथांग गभणे , स्वराली पडोळे, तेजोमय कामडी, यश्वशी ईश्वरकर , देवांशी कुंभारे , प्रिशा बोकडे, हर्ष वंजारी व काशवी वासनिक यांनी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. विशेष गिफ्ट म्हणून कु. सिद्धि घाटे हिने सायकल जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या यशस्वी कार्यक्रमासाठी ओबीएन अबॅकसचे संचालक श्री. अजय निनावे यांच्या नेतृत्वाखाली श्री. सौरभ निशाने, सौ. कु. मेघा कांबळे, कु. पुजा नेरकर कु. कोमल बुधे कु. श्वेता लांजेवार, कु. मिनाक्षी पाटील , कु. कांचन शुक्ला, आणि सौ. आकांक्षा निखाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सुत्र संचालन मयूरी दमाहे, प्रास्ताविक विजय केवट तर अभार प्रदर्शन सौरभ निशाने यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!