रुदय संस्थेद्वारे अंगणवाडी सेविकाची कार्यशाळा संपन्न
सिदेवाही तालुक्यातील मुरमाडी गावामध्ये ICDS अंतर्गत येणाऱ्या तीनही सर्कल मधील अंगणवाडी सेविकांची रुदय संस्था चंद्रपूर (गडचिरोली) च्या वतीने क्षेत्रिय अधिकारी सोनम आर. लाडे यांच्या वतीने दिनांक 18 डिसेंबरला कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेमध्ये डॉक्टर कल्याण गडरी मुंबई, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडम रंजना चौधरी व रुक्सार शेख उपस्थित होत्या. कार्यशाळे दरम्यान बालविवाह मुक्त भारत या अभियानाच्या संकल्पनेतून पोस्को कायदा, मुला,- मुलींवरील होणारे लैंगिक अत्याचार, गुड टच, बॅड टच तसेच किशोरवयीन मुलींची सभा घेताना योग्य ते मार्गदर्शन करावे व लैंगिक अत्याचारापासून बचाव कसे करावे, व त्यांना चाइल्ड हेल्पलाइन नंबर 1098 ची मदत केव्हा घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच त्यांना बाल संगोपन योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये अंगणवाडी सेविकांची एकूण उपस्थिती 130 होती तर मदतनीस व इतर कार्यकारी सुद्धा उपस्थित होते.