ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आंबेडकरी विचारांची मते ठरणार निर्णायक
- क्षेत्रात बौद्ध समाजाची ५० हजारांवर मते”
वेध विधानसभेचा…
*सावली*
दिवाळी संपताच राज्याच्या विधानसभा निवडणुकाचे वारे सुरु झाले, परिणामी राजकीय वातावरण तापू लागले असून पान-टपरी सह माध्यम आणि सोशल मिडिया प्लेटफार्म वर राजकीय तर्क वितर्क रंगु लागले, असल्याने नेत्या पेक्षा कार्यकर्त्यांच्या चर्चे ला पेव फुटताना दिसुन येत आहे ,आपला नेता किती सक्षम आहे हे पटवून देताना जराही कसर सोडताना दिसुन येत नाही. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात .१३..उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी, खरी लढत कांग्रेस आणि भाजपात दिसून येत आहे, हे क्षेत्र जरी जात निहाय कुणबी बहुल असले तरी आतापर्यंतच्या राजकारणात जातीय समीकरण चालू शकले नाही, किंबहुना या क्षेत्रात असलेला कुणबी समाज हा दोन भागात विभागल्या जाण्याचे संकेत आहे,कांग्रेस आणि भाजपा या प्रमुख पक्षात अनेक जि.स.प.स.सोबतच ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी कुणबी समाजाचे आहेत,त्यामुळे क्षेत्रात बहुसंख्य असलेल्या या समाजाचे विभाजन नेहमीच होताना दिसत आहे…
मागील दहा वर्षाचा विचार केल्यास राज्याचे विरोधी पक्षनेते ,तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आम.विजय वड्डेटीवार हे नेतृत्व करीत आहेत, वड्डेटीवार हे ओबीसी प्रवर्गातुन येतात ,सन २०१४ त्यांनी भाजपच्या प्रा.अतुल देशकर यांचा पराभव केला होता,त्यावेळी वड्डेटीवार यांना ७०हजार ३७३मते तर देशकर यांना ५६ हजार ७६३ मते मिळाली होती ,तर राकाचे संदीप गड्डमवार यांनी ४४हजार मते घेतली होती, त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत विजय वड्डेटीवार यांनी ९६ हजार ७२६ मते घेत विजय मिळविला,तर शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार यांना ७८ हजार मते मिळाली,आता २०२४च्या निवडणुकीत वड्डेटीवार हॉटी्क करण्यासाठी रिंगणात उभे आहेत,यावेळी त्यांचा थेट सामना भाजपाचे उमेदवार क्रिष्णा सहारे यांच्या सोबत दिसत आहे.सहारे हे कुणबी समाजातुन येतात,
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा जातीनिहाय मतदारांचे वर्गीकरण केलेल्या यात कुणबी समाज बहुसंख्य प्रमाणात दिसतो जवळपास ७० हजारांवर. मते , त्यानंतर अनुसूचित जातीतील बौध्द समाजाची ५० हजार मते दुसऱ्या क्रमांकावर आहेत,माळी,तेली,एन.टी(ढिवर),गोंड ,परधान समाजातील मते प्रत्येकी २५ते ३०हजारांवर येतात,त्यामुळे जातीय मते ही निर्णायक ठरत असतात, मागील निवडणुकांचा विचार केल्यास बौध्दांची मते हि निर्णायक ठरत असुन ती मते मिळविण्यात कांग्रेसला यश आले आहे, , तर बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाचे मतांचे मात्र भाजप कांग्रेस मध्ये विभाजन होत असल्याचे दिसते.
एकुणच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात
कांग्रेस, भाजप सह वंचित ,बसपाने सुध्दा आपले उमेदवार उभे केले आहेत, असे असले तरीही राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार आणि भाजपचे क्रिष्णा सहारे यांच्यात लढत होणार हेच चित्र निर्माण झाले आहे,बौध्दांची मते ही निर्णायक असुन ती मिळवण्यासाठी कांग्रेस ,भाजप सह,वंचित, बसपा प्रयत्नशील आहेत,प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात पोहचली असुन उमेदवारांसोबतच कार्यकर्ते च्या सभा, कार्नर सभा गृहभेटी जोरात सुरु आहेत….