विजयाचा निर्धार संकल्प करुया पुन्हा एकदा कमळ फुलवुया- मा. खा. अशोकजी नेते
विजयाचा निर्धार संकल्प करुया पुन्हा एकदा कमळ फुलवुया… मा. खा. अशोकजी नेते
भाजपा महायुती जनसंपर्क कार्यालयाचे धानोरा येथे भव्य उद्घाटन
दिनांक: ०५ नोव्हेंबर २०२४,
धानोरा
धानोरा: भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाई (आठवले)-पी. रि. पा. यांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांचे प्रचार कार्यालय धानोरा येथे भव्य सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले. माजी खासदार व भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उत्साही उपस्थिती होती.
या उद्घाटन समारंभात बोलताना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी जनसंपर्क कार्यालयाचे महत्त्व स्पष्ट करत सांगितले की, जनतेच्या समस्या जाणून घेण्यास हया कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे विजय मोहिमेची सुरुवात आहे, आणि आगामी निवडणुकीत विजयी निर्धार संकल्प करुया व पुन्हा एकदा कमळ फुलवुन महायुतीचा विजय निश्चित करूया, असा विश्वास मा.खा.नेते यांनी व्यक्त केला.
अशोकजी नेते यांनी मुख्यमंत्री “लाडकी बहीण” या महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण योजनेवर भर देऊन विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली. “महिला, शेतकरी,शेतमजूर आणि युवकांच्या कल्याणासाठी आमचे केंद्र व राज्य सरकार पाठिशी सदैव कटिबद्ध आहे,” माझ लोकसभेत पराभव जरी झाला असेल तरी मी लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे. मला लोकसभेच्या निवडणुकीत आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केल्याबद्दल मनापासून आभार मानतो असे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थित प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सांगितले. “डॉ. नरोटे हे जनतेचे खरे प्रतिनिधी असून, प्रगतीशील विचारांसह जनहितासाठी कटिबद्ध आहेत,” असे मत नेत्यांनी व्यक्त केले.
उद्घाटन सोहळ्यात मंचावर उपस्थित मान्यवर:
मा.खा.अशोकजी नेते,महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे, आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डाँ. देवरावजी होळी, माजी आमदार तथा भाजपा नेते डॉ. नामदेवराव उसेंडी,समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे,माजी जिल्हा अध्यक्ष तथा जेष्ठ नेते साईनाथजी साळवे, कृ.उ.बा.स.सभापती शशिकांतजी साळवे, तालुकाध्यक्षा लताताई पुंन्घाटे, ता.महामंत्री विजय कुमरे, शहराध्यक्ष सारंग साळवे,माजी सभापती अजमलजी रावते, माजी सभापती कोरेटी मँडम, युवा नेते साजनजी गुंडावार, संजयजी कुंडू, राकेशभाऊ दास, सोपानजी म्हशाखेत्री, गोपाल भाऊ उईके, जाकिर कुरेशी, महादेव गणोरकर,गजानन मेश्राम,तसेच महायुतीचे अनेक मान्यवर आणि पदाधिकारी.
उद्घाटनाच्या या प्रसंगी कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. प्रचार मोहिमेला चालना देण्यासाठी, या कार्यालयाने कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश निर्माण केला आहे. सर्व कार्यकर्ते सज्ज असून, आगामी निवडणुकीत डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजय मिळवून देण्यासाठी एकमुखाने प्रयत्नशील आहेत.