म.गांधींच्या विचारांना आत्मसात करून विद्यार्थ्यांनी विकासाचा विळा उचलावे…… कुसुम आलाम
*रा.म.गांधी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा उपक्रमाची सांगता
*सावली*-भारतातील बहुतांश लोकानी गांधीजीला समजले नाही,पुढारी, अधिकारी, व विद्यार्थी गांधींच्या नावाचा जयजयकार करतात,पण त्यांच्या विचारांना समजु शकले नाही,गांधींची अपेक्षा होती की,समाजातील प्रत्येक घटकाला व.शेवटच्या माणसाला किमान गरजा अन्न, वस्त्र, निवारा मिळाला.पाहिजे परंतु स्वातंत्र्याचा 75 वर्षानंतरही या गरजा पुर्ण झालेल्या दिसत नाही, म्हणून विद्यार्थांनी गांधींच्या विचारांना आत्मसात करून देश सेवेचा विळा उचलावा,असे प्रतिपादन साहित्यिक कुसुम आलाम यांनी केले,त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात आयोजित गांधी जयंती कार्यक्रमात बोलत होत्या.
राष्ट्रीय सेवा.योजना विभाग,राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय,आणि महात्मा गांधी विचारमंच सावली,यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता हीच सेवा’सप्ताह 26 सप्टेंबर ते 2 आक्टों.पर्यंत साजरा करण्यात आला,या अंतर्गत गांधींच्या जिवनावर.वक्तृत्व स्पर्धा,दैनंदिन जिवनात ज्ञानाचे महत्त्व,स्वच्छता जागृती रैली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,या कार्यक्रमाचा सांगता समारंभ महाविद्यालयात पार पडला,
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ संगिडवार,प्रमुख मार्गदर्शक, गांधी विचारवंत ,कवयित्री कुसुम आलाम,डॉ विजय शेंडे,अंकुर बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गाडेवार,गांधी विचारमंच चे अध्यक्ष सुधाकर गाडेवार,कोलप्याकवार,उपस्थित होते।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ चंद्रमौली यांनी केले,संचालन प्रा.खोब्रागडे मॉडम,तर आभार प्रा.उराडे यांनी मानले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.वताखेरे,प्रा.मार्कंडीवार ,तसेच डॉ खोब्रागडे,प्रा.कामडी,प्रा.वासाडे सह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचाऱी यांनी सहकार्य केले..