पांढरसराड तलावाची दुरुस्ती
*विरोधीपक्षनेते वडेट्टीवारांच्या प्रयत्नाला यश*
: पांढरसराड येथिल जलसंधारण विभागाच्या तलावाचा गेट व नहर नादुरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची अडचण येत होती. ही बाब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे लक्षात विजय कोरेवार यांनी आणून दिली असता तात्काळ प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे विभागाने तलावाचे काम केल्याने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली आहे.

सावली तालुक्यातील पांढरसराड येथे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचा तलाव असून गेट व नहर नादुरुस्त असल्याने नेहमी सिंचनासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होते. मागील वर्षी शेतकऱ्यांनी टीन व पोते टाकून कसेबसे पिक काढले मात्र यावर्षी सिंचना अभावी पिक काढणे कठीण असल्याने शेतकऱ्यांनी ही बाब पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांना कळविले. त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेकडे दुरुस्तीची मागणी केली.
तोंडावर पावसाळा असल्याने व सरकारी यंत्रणेला काम मंजूर करण्यासाठी कालावधी लागत असतांना शेतकऱ्यांची निकडीची गरज लक्षात घेता वडेट्टीवार यांनी काम तात्काळ करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जलसंधारण विभागाने गेट व नहराचे काम करून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे आभार मानले आहे.
*तलावाचे काम करणे गरजेचे होते. अन्यथा शेकडो एकर शेतपिक पाण्याविना मेली असती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काम करण्यास प्रयत्न केल्याबद्दल आभार.*
*अशोक अलाम*
शेतकरी तथा माजी सैनिक केंद्रीय राखीव पोलीस बल



