Vidarbh24News

Latest Online Breaking News

*बोथली येथे शिवजयंती निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*

*स्व.विक्की कोंकावार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवशाही युवा क्रिकेट क्लबचा उपक्रम*

सावली(प्रा.शेखर प्यारमवार)
सावली तालुक्यातील बोथली येथे शिवशाही युवा क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२४ चे आयोजन बस स्थानकाच्या समोरील पटांगणावर दिनांक १६ फेब्रुवारी ते अंतिम सामन्यापर्यंत करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि संधी मिळावी यासाठी एक गाव एक टीम हे उद्दिष्ट ठेवून ही स्पर्धा केवळ ग्रामीण भागाकरीता आयोजित केली आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २५००० हजार रुपये,द्वितीय पारितोषिक २०००० रुपये,तृतीय पारितोषिक १२०००,चतुर्थ पारितोषिक १०००० रुपये आणि वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत.
आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचे हस्ते होणार असून सहउद्घाटक संदीपभाऊ गड्डमवार,नितीन गोहणे,निखिल सुरमवार,सरपंच सुशील नरेड्डीवार ताराचंद खोब्रागडे यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त संघाने आपला प्रवेश निश्चित करून सहभाग दर्शवावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राहुल निरुडवार,उपाध्यक्ष आदित्य मुप्पावार,सचिव प्रतीक वरगंटीवार,कोषाध्यक्ष निलेश पूटकमवार,क्रीडा प्रमुख राधे कटकमवार,कर्णधार क्रीष्णा मानिकवार आणि मंडळातील सदस्यांनी केला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!