चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, एक हजारांची स्वीकारली लाच
चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, एक हजारांची स्वीकारली लाच
– इ – पास साठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली लाच
विदर्भ 24 न्यूज
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : एक हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चामोर्शी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. ई – पास काढण्यासाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी स्वीकारली लाच डॉ. मनोज भिवाजी पेंदाम, असे लाचखोर डॉक्टरचे नाव आहे. तक्रारदार चामोर्शी तालुक्यातीलच रहिवासी असून वाहन चालक आहे. त्याला चंद्रपूर जिल्ह्यात जाण्यासाठी ई – पास काढण्याकरीता वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता होती. मात्र डॉ. पेंदाम यानी प्रमाणपत्रासाठी १ हजारांची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर सापळा कार्यवाहीचे आयोजन केले. लाच स्वीकारताना डॉ. पेंदाम वर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, सापळा कारवाई पथक पोलिस हवालदार नथ्थु धोटे,पोलिस नाईक सतिश कत्तीवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई महेश कुकुडकर यांनी केली आहे .



