प्रभाग क्र.१३ येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
प्रभाग क्र.१३ येथे श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
सिंदेवाही – तेली समाजाचे आराध्य दैवत मानवतेची शिकवण देणारे थोर संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती प्रभाग क्रमांक 13 भरडकर मोहोल्ला सिंदेवाही येथे जयंती उत्साव उत्साहात साजरी करण्यात आली . उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते संताजीच्या प्रतिमेस माल्याअर्पणआणि दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून रघुनाथजी शेंडे, प्रमुख पाहुणे घुगस्कर सर,प्रा. डॉ वरभे सर, डूबराज ठाकरे , गंडाटेजी, करकाडे , तेली समजातील युवा कार्यकर्ते होते. या कार्यक्रमात सहभागी समाज बांधव सोमाजी भरडकर, देवरावजी ठाकरे, नामदेवजी ठाकरे ,संदीप भरडकर सर , कावडे सर,दुधारामजी ठाकरे , महीला शुभागी शेंडे,आशा गंडाटे, छबूताई नागोसे , रजनी भरडकर, सुशिलाताई भरडकर, छबूताई नागोसे , सिंधुताई समर्थ आणि संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जागृती युवराज ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.




