राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात महामानवास अभिवादन
सावली: राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,सावली येथील सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून माधव गुरनुले सर( राज्यशास्त्र विभाग प्रमुख. खत्री महाविद्यालय चंद्रपूर )व प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. प्रेरणा मोडक , डॉ.दिलीप कामडी , प्राध्यापक संदीप देशमुख हे होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त किटी शेडमाके,वैष्णवी अलाम,तनिष्का घोनमोडे, जागृती गद्दे युरेशा घोनमोडे या सर्वांनी खूप छान गीत गाऊन महामानवाला श्रध्दांजली अर्पण केली. व तनिष्का घोनमोडे व जागृती गद्दे यांनी भाषण देऊन महामानवाच्या विचारांना उजाळा दिला.प्रमुख मार्गदर्शक माधव गुरनुले सर यांनी बाबासाहेबांच्या संपूर्ण विचारांचा आढावा घेऊन सांगितले की त्यांनी त्यांचे गुरू महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार पुढे नेऊन त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले. पुढे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगताना सांगितले की त्यांनी सर्वांना शिक्षण हे मोफत व सक्तीचे असले पाहिजे ,उद्योगांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे ,प्रोब्लेम ऑफ रुपीज, रिझर्व बँकेची स्थापना ,त्यांचे शेतीविषयक विचार सांगून त्यांच्या सामाजिक,आर्थिक, व धार्मिक विचारांनी विद्यार्थी प्रेरित झाले पाहिजे असे मत मांडले. अध्यक्षीय भाषणातून डॉ अशोक खोब्रागडे यांनी महामानव विषयी विचार व्यक्त करताना महटले की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जाती ,धर्म पंथ ,भाषा अश्या विविधतेने नटलेल्या या भारत देशाला एकसुत्रते मध्ये बांधण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे आणि ती फक्त डॉ. बाबासाहेबांच्या मुळे आपल्याला मिळाली आहे. डॉ. बाबासाहेबांनी जी लोकशाहीची व्याख्या दिली त्या नुसार आपला देश प्रगतीपथावर जावो अशी आशा अध्यक्षीय भाषणातून त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. यूरेशा घोनमोडे (बी . एससी . द्वितीय)व आभार निधी शेंडे (बी . एससी व्दितीय)यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. दिवाकर उराडे (समाजशास्त्र विभाग प्रमुख) प्राध्यापक विनोद बडवाईक(वाणिज्य विभाग प्रमुख ) प्राध्यापक स्मिता राऊत (सांस्कृतिक विभाग प्रमुख) व प्रा.महानंदा भाकरे, प्रा. डॉ. रामचंद्र वासेकर . प्रा.डॉ.किरण कापगते( सदस्य सांस्कृतिक विभाग)यांनी केले.कार्यक्रमाला प्रा.वासाडे ,प्रा.सोनटक्के,प्रा.बागडे ,प्रा,वाताखेरे, प्रा.डॉ. मार्कंडेवार,प्रा डॉ. वैराले,प्रा.डॉ. पवार,प्रा.घागरगुंडे ,प्रा.शेंडे. प्रा. डॉ.सचिन चौधरी, प्रा.डॉ पाटील, प्रा.सचिन वाकडे, शिक्षकेत्तर कर्मचारी येल्लेवार,सागर येल्लटीवार,गिरीश डोंगरे, गणेश गड्डमवार तसेच हरी भाऊ,किशोर बोरकर, सातक भाऊ ,नरेश अलाम, उपस्थित होते.



