वाढदिवसानिमित्त नोटबुक व पेनचे वितरण
अमित भोपयेनी केला शालेय विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा
आज अमित पत्रूजी भोपये यांचा वाढदिवस आहे. आज रविवारला शालेय सुट्टी असल्याने कालच आपला वाढदिवस मित्रासोबत किंवा घरी साजरा न करता शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशरवाही येथे केक कापण्यात आले. विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेनचे वितरण अमित भोपये यांच्या हस्ते करण्यात आले. अमित भोपये शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत हे विशेष!
यावेळी हेमंत आभारे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिति केशरवाही , वामन भोपये ग्रा.प सदस्य हिरापुर, रजनीकांत गेडाम मुख्याधापक जि. प. शाळा केशरवाही, अभिषेक बोरकुटे ,दिनेश भोपये, विकास आभारे , स्वप्निल शेंडे ,भूषण हेटकर, विरू भोपये आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



