धम्मचक्र प्रवर्तन दिन गडचिरोलीत साजरा
गडचिरोली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर येथे धम्मदीक्षा दिली या दिनाचे औचित्य साधून The Path To a Happy Life (सुखी जिवन मार्ग) अंतर्गत दिनांक 14/10/2023 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दीन सायंकाळी 05:00 वाजता गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वनिता पोवरकर, प्रमुख अतिथी आयु. मायाताई मोहूर्ले, प्रमुख पाहुणे आयु.भावना बोलीवार, आयु. दुशिला एल. जी. प्रमुख मार्गदर्शक आयु. लक्ष्मण मोहुलें साहेब, प्रमुख पाहुणे दौलत पोवरे साहेब, परशुराम बोलीवार, नंदेश्वर कथले , रोशन इप्पावर, वैष्णवी ईप्पावार होते. यावेळी नितीन मेश्राम व सिमरन मेश्राम यांनी धम्मदीक्षा घेतली.
कार्यक्रमाचे संचालन सतीश दुर्गमवार, प्रास्ताविक आयु. धम्मराव तानादु- कल्याणमित्र व आभार क्षितिज दूर्गमवार यांनी केले.



