Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखेर व्याहाड बूज. येथील युवकाचा प्रेत सोनापुर नदीपात्रात मिळाला

सावली तालुक्यातील व्याहाड बूज. येथील १८ वर्षीय युवक आर्यन यादव सातपैसे हा युवक इयत्ता १२ वी मध्ये नवभारत विद्यालय व्याहाड बूज. येथे शिक्षण घेत होता . दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास स्वतःची गाडी घेऊन शौचालयास जातो असे घरी सांगून निघून गेला . ११:०० वाजेच्या सुमारास त्याची गाडी वैनगंगा नदीच्या पुलावर आढळून आली . घरच्या लोकांनी सर्व नातेवाईकाकडे , आजूबाजूला , गावात, बाहेर चौकशी केली असता तो कुणाच्याच घरी मिळाला नाही . त्यामुळे सावली पोलीस स्टेशनला त्याचे वडील यादव सातपैसे यांनी आर्यन यादव सातपैसे हरविल्याची तक्रार दिली .
तेव्हापासून सावली पोलीस आणि घरचे व्यक्ती त्याचा शोध घेत होते मात्र त्याचा तपास कुठेही लागलेला नव्हता . अखेर १९ दिवसानंतर दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सोनापूर नदीपात्रातील पाण्याच्या टाकीजवळ एक प्रेत झाडाला लटकलेला आढळून आला असल्याची माहिती मिळाली . यावरून सावली पोलीस यांनी चौकशी केली असता तो प्रेत व्याहाड बूज. येथील आर्यन यादव सातपैसे याची असल्याचे सिद्ध झाले .
सदर प्रकरणाचा संपूर्ण तपास सावली ठाण्याचे ठाणेदार श्री आशिष बोरकर आणि त्यांचे सर्व सहाय्यक पोलीस कर्मचारी यांनी केले .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!