Vidarbh24News

Latest Online Breaking News

*परीचारीकेचा अकस्मात मृत्यू

* सावली चे ग्रामीण रुग्णालयात हळहळ

सावली येथील ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेचा अकस्मात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना (दि. 6) रोजी घडली. अलका अशोक नागरे (26) असे मृतक परिचारिकेचे नाव आहे.
सावलीचे ग्रामीण रुग्णालयात सदर परिचारिकाही मागील चार वर्षापासून कर्तव्यावर होती. ती मूळची जालना जिल्ह्यातील होती. नोकरी निमित्ताने ती सावली येथे राहत होती. ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असताना तिला अचानक चक्कर आली. उपचाराकरिता सदर परिचारिकेला गडचिरोली येथे भरती करण्यात आले. परंतु मेंदूमध्ये गाठ असल्याचे निष्पन्न झाल्याने रक्तप्रवाह बंद झाला होता. त्यामुळे पुढील उपचाराकरिता नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे भरती करण्यात आले. परंतु उपचारदरम्यान परिचारिकेचा मृत्यू झाला. सदर परिचारिका ही मनमिळाऊ व संयमी स्वभावाची होती. तिच्या जाण्याने सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयात श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाघधरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ.सुरेश कांदे, कर्मचारी व परिचारिका यांची उपस्थिती होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!