कवठी येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
कवठी येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यू
*कवठी प्रतिनिधी*सावली तालुक्याच्या जवळच असलेल्या कवठी या गावामध्ये दि 15 jun 2020 ला 5 वाजता च्या सुमारास गुणाजी येलमुले यांची पत्नी सपना येलमुले (25)हिला सर्प ने चावले असता तिला गडचिरोली येथील सरकारी रुग्णालयात हलविन्यात आले मात्र तिला डाँक्टरानी मृत घोषित केले हिला एक छोटस 2वर्षाचं बाळ आहे आणि परिवारामध्ये तीन च लोक राहत होते आता छोट्यास्या बाळाची आई मरण पावल्यामुळे अतिशय गंभीर दुखापत झाली आहे मृतक महिलेची आई आजारी असल्यामुळे आईला घरकामामध्ये आणि शेती कामामध्ये मदत करण्याकरिता ती आईच्या घरी गेली होती आणि आई आजारी असल्यामुळे सर्व कामे ती करत होती वडिलांचा घर शेतीला लागूनच असल्यामुळे घराजवळील शेतामध्येच तिला सर्पदंश झाल्याचे वर्तवले जात आहे .पहिलेच आई आजारी असल्याच दुःख आनखी मुलगी मरण पावल्याच दुःख मात्र ही माहिती कळताच परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि आज महिलेचे अंतिम संस्कार जवळपास 12 वाजताच्या सुमारास कवठी येथे करण्यात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे




