Vidarbh24News

Latest Online Breaking News

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथे आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथे आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न
सविस्तर वृत्त असे की, आज रविवारला दिवंगत स्वागता उर्फ चीमुचा जन्मदिवस साजरा करतांना खोब्रागडे , रामटेके परिवाराने एक आगळा वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम साजरा केला. यांचे हे कार्य प्रेरणादायी असून काहीतरी प्रबोधन घेण्यासारखे आहे. विशेष म्हणजे तिच्या वाढदिवसानिमित्त रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा, ऊत्तम शिक्षक स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभाग दर्शवीला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. तसेच खोब्रागडे परिवाराकडून 1 ते 7 च्या विद्यार्थांना डायरी, चित्रकला वह्या, रांगोळी वह्या, वाढदिवस निमित्त नोटबुक व पेन यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा उच्च प्रा.शाळा जेप्रा शाळेला क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले , छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे फोटो भेट देण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जि. प .उ. प्रा.शा. जेप्रा शाळेचे मुख्याध्यापक
ओमदेव आदे तर उपाधक्ष्य किसान विद्यालय शाळेचे प्राचार्य मुकुंद पाटील म्हशांखेत्री प्रमुख पाहुणे गावचे प्रथम नागरिक सरपंच शशिकला झंजाळ, मनोज भांडेकर शां. व्य. समीती, अध्यक्ष, किशोर नरुले शा. व्य. स. उपाध्यक्ष, कुंदाताई लोनबले उपसरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अरविंद उरकुडे ,मनोगत अमोल खोब्रागडे , प्रास्ताविक चंद्रसेन खोब्रागडे, तर आभार प्रदर्शन रमेश रामटेके यांनी व्यक्त केले .विद्यार्थांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!