Vidarbh24News

Latest Online Breaking News

बावनकुळेच्या बेताल वक्तव्याचा पत्रकारांनी केला निषेध

*तहसीलदारा मार्फत पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन *
सावली ( लोकमत दुधे )
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत बेताल व्यक्तव्य केले या विरोधात सावली येथील पत्रकारांनी निषेध नोंदवून शासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे निवेदन तहसीलदार यांचे मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविले.
पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, असे सांगत त्यांना धाब्यावरही घेऊन जा असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. असे बेताल व्यक्तव्य केल्याने पत्रकारांमध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या आहेत.
भाजपा ज्या वेळेपासून सत्तेत आली त्या वेळेपासून भाजपाचे पदाधिकारी महापुरुषाबाबत अपशब्द बोलून नेहमी अपमानित करीत आहेत. तर आता पत्रकाराबाबत बोलून पत्रकारांना अपमानित केलेले आहे. असे अपमानीत शब्द खपवून घेणार नाही असा निर्धार सावली तालुक्यातील पत्रकारांनी करीत बावनकुळे यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी पत्रकार अनिल गुरनुले, आशिष दुधे, लोकमत दुधे, बाबा मेश्राम, ,उदय गडकरी, चंद्रकांत गेडाम, अनिल स्वामी, शितल पवार, दिलीप फुलबांधे, सुजित भसारकर, विजय गायकवाड, प्रवीण झोड़े, नासीर अन्सारी, चंद्रशेखर पॉरमवार,सौरभ गोहणे, टीकाराम मशाखेत्री उपस्थित होते …….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!