Vidarbh24News

Latest Online Breaking News

*सावलीमध्ये गणेश विसर्जनात तिघांचा मृत्यू*

*मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश*

काल रात्री जय बजरंग गणेश मंडळ सावली तर्फे गणेश विसर्जन करण्यात आले. गणेश मूर्ती असोला मेंढ्यांच्या गोसीखुर्द कालव्यात विसर्जन करण्या दरम्यान तीन लोकांचा मृत्यू झाला यामध्ये एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
याबाबत सविस्तर असे की, काल रात्री सावली शहरातून गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली. सावलीत एकुण तीन सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. दोन गणेश मंडळाने सावलीतील गाव तलावात विसर्जन केले तर जय बजरंग गणेश मंडळाने आसोला मेंढ्यांच्या गोसीखुर्द कालव्यात विसर्जन करण्याचे निश्चित केले. मिरवणूक गोसीखुर्द कालव्यावर सुखरूप पोहचली. परंतु विसर्जना दरम्यान निकेश हरीभाऊ गुंडावार(३१) राहणार चांदली बुज याचा पाय घसरुन गोसीखुर्दच्या कालव्यात पडला भावाला वाचविण्यासाठी
संदीप हरिभाऊ गुंडावार(२७) याने उडी मारली. या दोन भावांना वाचविण्यासाठी सचिन( गुरू) दिवाकर मोहुर्ले राहणार सावली याने गोसीखुर्दच्या कालव्यात उडी मारली. सचिन( गुरू) दिवाकर मोहुर्ले यांचे शव रात्रीचं मिळाले परंतु निकेश हरीभाऊ गुंडावार(३१) आणि संदिप हरीभाऊ गुंडावार(२७) या दोन सख्ख्या भावांचे शव अजून पर्यंत मिळाले नाहीं.
सावली शहरातील पोलीस ठाणेदार आशिष बोरकर हे अधिक तपास करीत आहेत. गणेश विसर्जन तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक हळहळ करीत आहेत

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!