प्राणीशास्त्र विभागातर्फे अँड -ऑन सर्टिफिकेट कोर्सचा उद्घाटन सोहळा
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे प्राणिशास्त्र विभागातर्फे अँड -ऑन सर्टिफिकेट कोर्स हा “वर्मीकंपोस्टिंग” या विषयावर घेण्यात येणार आहे.या सर्टिफिकेट कोर्स चा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले मार्गदर्शक सावली तालुका कृषी अधिकारी अश्विनीताई गोडसे यांनी गांडूळ शेती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपयुक्त कशी आहे आणि हा विषय का निवडावा याविषयी तसेच तृणधान्यांचे महत्त्व देखील त्यांनी समजावून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे सरांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना या विषयाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश घागरगुंडे यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. किरण बोरकर यांनी केले याप्रसंगी प्रा. वासाडे प्रा. पल्लवी बोरकर, प्रा. रागिनी उमलवार उपस्थित होते.



