शेतात विज पडून दोन ठार एक जखमी
शेतात रोवना चे काम करीत असताना आज 26 जुलै 2023 ला बुधवारी दुपारच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला व शेतात काम करीत असलेल्या कल्पना प्रकाश झोडे रा. देलनवाडी अंदाजे वय 45 अंजना रुपचंद पुस्तोडे रा. देलनवाडी अंदाजे वय 48 यांच्यावर दरम्यान 4.00 वाजता विज पडून त्या मयत झाल्या. तर सुनिता सुरेश आंनदे वय 35रा. देलनवाडी जखमी झाल्या आहेत.
सदर घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली असुन तात्काळ घटनास्थळी सिंदेवाही तहसीलदार शिंदे व मंडळ अधिकारी तोडसाम ,तलाठी खरकाटे हे दाखल झाले तसेच पोलीस अधिकारी हे सुद्धा घटनास्थळी पोहचले असून घटनेचा पंचनामा केला आहे



