वाघाच्या हल्यात शेतकरी ठार.
किशोर नरुले ग्रामीण प्रतिनिधी
गडचिरोली दिनांक 11 जुलै 2023 ला पुन्हा एकदा वाघाने हल्ला चढविला यावरून तालुक्यातील वाघाचे मानवावरील हल्ले थांबण्याचे लक्षण दिसत नाही. सावरगाव शेत शिवार परिसरात वाघाने हल्ला करून जिवंत ठार केले व नरडीचा रक्ताचा घोट पिला. ही घटना 2.30 वाजताच्या सुमारास घडली सदर इसमाचे नाव ईश्वर कुंभारे वय 50 वर्ष सावरगाव नाव असून सदर शेतकरी आपल्या शेतावर काम करत असताना अचानक जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात शेतकरी इसम जिवंत ठार झाला असून गावातील लोक वारंवार होणाऱ्या घटना मुळे त्रस्त झाले आहेत यामुळे तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत, सदर घटनेमुळे अश्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांची असून वनविभाग याकडे काय कार्यवाही करतात की निर्दयी मन करून आणखी किती बळी जाण्याची वाट पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



