*बिबट्याच्या हल्यात एक इसम जखमी*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
सावली पासून ५ किमी अंतरावर असलेल्या बोथली येथील भीमा कन्नावार वय ६० वर्ष या नावाच्या व्यक्ती गावात जागा नसल्याने आपल्या बकरी आणि शेळी च्या कळपासोबत गावाबाहेर असलेल्या नदीच्या तीरावर वास्तव्यात राहतो.
आज रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास बिबट्याने तो राहत असलेल्या तंबूत शिरून त्याचेवर हल्ला केला त्यात तो जखमी झाला.वनविभागाचे कर्मचारी व गावातील नागरिकांनी प्राथमिक उपचारासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात भरती केले.परंतु तिथे उपचार न झाल्याने सदर व्यक्तीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.
वाघ आणि बिबट्याचे हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले असून वाघ आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.



