Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामंजस्य करार

सावली:प्रा.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर व मारगीन कंसल्टी प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांच्यामध्ये दिंनाक २० जून २०२३ ला सामंजस्य करार करण्यात आला. ह्या करारा अंतर्गत महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये विद्यार्थांसाठी आभासी पद्धतीने व प्रत्यक्षरीत्या विद्यार्थ्याना व्यक्तिमत्त्व विकास, मानव संसाधन विकास, डिजिटल मार्केटिंग, वित्तीय साक्षरता , मुलाखती ची तयारी कशी करायची इत्यादी संबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम महाविद्यालयाच्या करिअर गाईडन्स व प्लेसमेंट सेल अंतर्गत राबविले जाणार आहेत. हे सामंजस्य करार करतांना महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.अशोक खोब्रागडे व मारगीन कंसल्टी प्रायव्हेट लिमिटेड चे सह संस्थापक व संचालक गुणवंत आंबेकर,आक्युएसी समन्वयक प्रा.संदीप देशमुख,मारगीन प्रायव्हेट लिमिटेड चे समन्वयक उल्हास आलेवार,करिअर गाईडन्स व प्लेसमेंट सेल चे समन्वयक प्रा.डॉ.विजयसिंग पवार व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. हा सामंजस्य करार करण्याचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास करणे हा आहे… तरी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!