Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या प्रयत्नांना यश

संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना फायदा.
अखिल भारतीय.मादगी समाज संघटना स्थापन केल्यापासून अस्वच्छ मुलांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मोहन देवतळे सातत्याने प्रयत्न करीत होते. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात जावून दिवंगत दिपक बोलीवार यांनी सुध्दा याबाबत चर्चा व निवेदने दिलेले होते व फोनद्वारे सुध्दा पाठपुरावा करीत होते. या संघटनेचे नवनियुक्त चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिल बोटकावार यांनी सातत्याने निवेदने देवून व प्रत्यक्षात भेट देवून समाजावर झालेल्या अन्यायाची माहीती देवून न्याय मिळवून देण्याकरिता सतत प्रयत्न करीत आहेत.याच प्रयत्नांची दखल समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी घेऊन १५ पानाचा पत्र सुध्दा नुकताच ०९ जून २०२३ ला संघटनेच्या नावानी अनिल बोटकावार यांना आला. याच पत्राला उत्तर म्हणून एक निवेदन सादर करण्याकरिता संघटनेचे नवनियुक्त *प्रदेश अध्यक्ष रुपचंद लाटेलवार प्रत्यक्षात पुणे येथे जावून याबाबत आयुक्तांशी चर्चा करून मागणी मान्य करून घेतली. सात वर्षाचा संघर्ष आज अखेर यशस्वी झालेला आहे. याचे समाधान व आनंद समाजात दिसून येत आहे अस्वच्छ कामगाराच्या पाल्यांना मिळणारी प्रलंबित शिष्यवृत्ती वितरीत करण्याचा आदेश समाजकल्याण आयुक्तालयानी दिला. महाराष्ट्रातील सर्व संबंधित विभागाना ईमेलद्वारे आदेश समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी लगेच दहा लाखाचा फंड मंजूर केला. महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवाना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ होणार आहे. त्यामुळें समाज बांधवात आनंदाचे वातावरण आहे. समाजातील सर्व समाज बांधव अखिल भारतीय मादगी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार मानले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!