खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा*
गडचिरोली:-योग आहे आरोग्यासाठी क्रांती, नियमित योगामुळे जीवनात येथे सुख-शांती..आरोग्यम् धनसंपदाक रो योग,रहो निरोग संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने, संपूर्ण देशात एकाच वेळी आतंरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.व्यक्तीच्या शारीरिक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभूत आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज ,गडचिरोली स्टेडियम ग्राउंडवर खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात योग दिन साजरा करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने शिबिराला जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, योग शिक्षक अनिल निकोडे, योग शिक्षक खुशाल म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटि,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रशांत भुगुवार, अनिल कुनघाडकर, सचिनभाऊ तंंगडपल्लीवार, केशव निंबोड, राकेश शेरकी, राकेश राचमलवार, हर्षल गेडाम, तसेच कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवक वर्ग या योग शिबिराला उपस्थित होते.
या शिबिराच्या निमित्याने या शिबिराला अतिशय चांगला योग शिकवणारे योग शिक्षक अनिल निकोडे,खुशाल मस्के,बॉक्सिंग गोल्ड मेडलिस्ट शितल दाजगाये, यांचे शाल श्रीफळ देऊन खासदार अशोक नेते यांनी सत्कार केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.अशा प्रकारे शिबिर यशस्वीपणे संपन्न झाला



