Vidarbh24News

Latest Online Breaking News

गोंडवाना विद्यापीठाच्या दिक्षांत सोहळ्याला महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजर राहणार

खासदार अशोक नेते यांच्या विनंतीस मान देऊन गडचिरोलीला येणार 
दि. २१ जून २०२३
गडचिरोली:-गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे प्रशासकीय इमारतीचे शीलान्यास व दीक्षांत समारोह या कार्यक्रमासाठी खासदार अशोकजी नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी जी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे गडचिरोली येण्या संबधित चर्चा करून निवेदनाद्वारे दि.१० मे २०२३ रोजी भेट घेत मागणी केली होती.त्यावेळी सोबत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते.

त्याच अनुषंगाने खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या मागणीनुसार महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रोपदी मुर्मू जी हया ५ जुलै ला गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार अशी माहिती खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दिली.

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत,अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच कदाचित घटना असेल याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान खासदार अशोकजी नेते यांनी केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!