पेरनी योग्य २८,४५६ हेक्टर खरीप हंगामाला पावसाची प्रतीक्षा
* मशागत करुण शेतकरी सज्ज *
* रोहिणी पाठोपाठ मृग कोरडा *
*उष्णतेची दाहकता कायम *
सावली ( लोकमत दुधे/ बाबा मेश्राम)
उन्हाळा संपुन पावसाळा सुरु झाला रब्बी नतर खरीपाचा हंगाम सुरु झाल्यानतरही पावसाने दड़ी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला असला तरी उन्हाची तीव्र दाहकता आजही कायम असल्याचे दिसुन येत आहे ख़रीपाचा हंगाम सुरु होऊन पावसाने मारलेल्या दड़ी मुळे तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी पेरणीयोग्य ख़रीपाचे २८४५६ हेक्टर क्षेत्र पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसुन येत आहे ख़रीपाच्या पेरनी दरम्यान ऐन पावसाने दड़ी मारल्याने ख़रीपाचा हंगाम लाम्बनिवर जाण्याची शक्यता शेतक ऱ्या कडून वर्तविली जात असली तरी तालुक्यात ज्या शेतक ऱ्याकडे विहिरी बोरवेल ची व्यवस्था आहे अशानि पेरनी केल्याचा अंदाज कृषि विभागाकड़ूं वर्तविला जात असला तरी पावसा शिवाय पेरनी करू नये अन्यता महागडी बियाने वाया जातिल आणि पुन्हा पेरणीचा भुरदंड शेतक ऱ्यांना सोसावा लागेल अशा सूचना शेतक ऱ्यांना कृषि विभागा मार्फत दिल्या जात आहे रोहिणी पाठोपाठ हत्तीचे वाहन घेऊन आलेले मृग नक्षत्र संपन्याच्या मार्गावर असताना पेरनी योग्य पाऊस पडू शकला नाही मृगा नतर आद्रा नक्षत्रा कडून पावसाची अपेक्षा शेतक ऱ्या वर्तविली जात असली तरी उशिरा येणारा पाऊस उशिरा पर्यन्त साथ देईल या आशेवर शेतकरी राजा चातका प्रमाणे ख़रीपाच्या पेरनिची मशागत पूर्ण करुण पावसाची वाट पाहात आहे परिणामी मृग नक्षत्रात पाऊस वेळेवर.येईल अशी आशा असताना मात्र मृग नक्षत्र संपन्याच्या मार्गावर असून तालुक्यात पाऊस न.पडल्याने.शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत.चिंतातुर झालेला दिसुन येत आहे,मृग नक्षत्रात. पाऊस शेतक-यांना हुलकावणी देत.आहे त्यामुळे तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा आभाळाकडे पावसाच्या प्रतिक्षेत आस घेऊन पाहत असल्याचे. चित्र निर्माण झाले आहे..
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पाऊस वेळेवर येईल असा अंदाज हवामान खात्यामार्फत दिला जात होता ,त्यामुळे रोहिणी नक्षत्रातच शेतकऱ्यांने पेरणीपुर्व शेतीची मशागत करून ठेवली, यात त्याने शेतातील तण,केरकचरा, आदी जाळपोळ करून शेती पेरणी साठी तयार केली ,आणि मृगात पाऊस पडेल या आशेवर असताना मृग नक्षत्र संपन्याच्या मार्गावर असताना तालुक्यात थेंबभर.सुध्दा पाऊस न पडल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे,त्यामुळे रोहिणी मृग नक्षत्र कोरडे जात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे ,तर काही शेतक-यांनी मृगातील पेरणी योग्य म्हणुन धान पिकांची पेरनी केल्याचे दिसत आहेत ,तर कित्येकानी पावसाची पर्वा न करता आवत्या ची पेर केली केल्याचे दिसुन येत आहे परंतु पावसाचा जुन महीना संपन्याच्या मार्गावर असताना पावसा व्यतिरिक्त उन्हाची दहाकता दिवसागनिक वाढताना दिसते त्यामुळे उन्हाच्या उकीरड्यामुळे पेरलेले धान बी करपण्याची भीति वर्तविली जात आहे पावसाचे मृग नक्षत्र पुर्णतः कोरडे जात असल्याने बळीराजा चिंतातुर होऊन आभाळाकडे पावसाच्या आशेने चातकासारखे पाहत आहे,
मागील हंगामात अवकाळी पाऊस,तर जुलै आगस्ट मध्ये पाऊसाने पुर परिस्थिती,यामुळे शेतकरी निराश झाला असतानाही चालु हंगामात ऊसनवारी व.कर्ज काढून उद्याचे स्वप्न डोळ्यात साठवून मोठ्या उमदीने शेती करायला तयार झाला आहे,परंतु पावसाचा थेंबही पडत नसल्याने आणि जुन महिन्यात उन्हाचा तडाखा कायम असल्याने शेतकरी चिंतातुर अवस्थेत दिसून येत आहे. …..
तालुक्यातील ब्रिटिश कालीन आसोलामेंढा तलाव गोसे अंतर्गत पाण्याच्या साठवणुकीसाठी सज्ज झाला असला तरी धानपिकाच्या पेरणी साठी वरुण राज्याची अपेक्षा आहे मात्र ऐन ख़रीपाच्या पेरनीच्या मोक्यावर पावसाने दड़ी मारल्याने शेतकरी राजा चिंतातुर झाला असून पावसा अभावी पेरनी योग्य २८,४५६ हेक्टर ख़रीपाच्या हंगामाला पावसाची प्रतीक्षा असल्याचे दिसुन येत आहे …….



